TrendingBreaking News

Tomato Market भाव पडले तेव्हा सरकार कुठे होते, शेतकरी नेत्यांचा सरकारला सवाल

Tomato Market किसान सभेकडून निषेध. देशात टोमॅटोचे दर वाढल्याने केंद्र सरकार हस्तक्षेप करून नाफेड मार्फत खरेदीकरून दर पाडण्याचा प्रयत्न करत आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी अशीच विपरीत परिस्थिती निर्माण झाली होती आणि टोमॅटोचे दर पडले होते. त्या वेळी टोमॅटो तोडून बाजारात नेण्याएवढेही पैसे मिळत नसल्याने जागोजागी टोमॅटोचा चिखल झाला होता. त्या वेळी केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा वाटला नाही. आता मात्र एकतर्फी होणारा हस्तक्षेप संताप आणणारा आहे, असा संताप शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Tomato Market दरम्यान, केंद्राच्या या निर्णयाचा निषेध अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी केला. डॉ. नवले म्हणाले, “शेतकरी जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा सरकारला हस्तक्षेपाची इच्छा होत नाही. आता कोठे शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले, की लगेच टोमॅटोचे दर वाढल्याने ग्राहकांना स्वस्तात टोमॅटो पुरविण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतली आहे. केंद्र सरकार नाफेडमधून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात टोमॅटो खरेदी करणार आहे. केंद्र सरकार करत असलेला अन्याय दुर्दैवी आहे.’

सरकारकडून भाव पाडण्याचा डाव

Related Articles

Back to top button