Health News सकाळी सर्वप्रथम काय खावे? हा प्रश्न तुमच्याही मनात कायम असेल तर आम्ही त्याचे उत्तर येथे देणार आहोत. निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या दिवसाची सुरुवात चांगली केली पाहिजे, आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेक वेळा लोक सकाळी उठतात आणि बराच वेळ काहीही खात नाहीत, जे आरोग्यासाठी चांगले नसते. तुमच्या दिवसाची सुरुवात बदाम, अंजीर, मनुका आणि अक्रोडाने करा. एक रात्र आधी तयार करावी लागेल. हे ड्रायफ्रुट्स रात्री भिजत ठेवा आणि सकाळी खा. भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाण्याचे अगणित फायदे आहेत.