TrendingBreaking News

Tomato Rate मंदी आली, मातीमोल भाव झाले तेव्हा शेतकरी आठवत नाही

Tomato Rate मंदी आली, मातीमोल भाव झाले तेव्हा शेतकरी आठवत नाही. मात्र शेती मालाच्या दरात सुधारणा झाली की, लगेच ग्राहक आठवतो.

“कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांसाठी निर्णय नाही, मात्र ग्राहकांसाठीलगेच अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे सरकार असे वारंवार सांगायचे आणिशेतकऱ्यांनाच अडचणीत आणायचे असे काम सुरू आहे.

सरकारकडून भाव पाडण्याचा डाव Tomato Rate

“सध्या टोमॅटोचे भाव वाढल्याने देशभर कल्लोळ तयार झाला आहे. मात्र याच टोमॅटोचे भाव जेव्हा पडलेले होते, तेव्हा सरकार कुठे होते, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे. ज्यांना या भावात टोमॅटो खाणे शक्य होत नाही, अशा ग्राहकांनी काही दिवस न खाल्ले तरी कुठे बिघडणार आहे,” असा प्रश्नही त्यांनी शहरी ग्राहकांना केला.

Inflation तेल स्वस्त, डाळी महाग महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर

टोमॅटोचे दर वाढल्याने ते नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. हा प्रकार शेतकऱ्यांना मिळत असलेला भाव पाडण्यासाठी असल्याचा थेट आरोप तुपकर यांनी केला आहे. भाव पडले तेव्हा कुठल्याच सरकारने शेतकऱ्यांना दोन पैशांची मदत केलेली नाही. शेतकऱ्यांनी मदतीसाठी निवेदने दिली होती. त्याची दखलही घेतली गेली नाही. जेव्हा हा पोशिंदा संकटात असतो, त्या वेळी कुणीही त्याच्या पाठीशी उभे राहत नाही, असे तुपकर म्हणाले.

PM Vay Vandana Yojana 2023 विवाहित जोडप्यांना मिळणार दरमहा 18500 रुपये पेन्शन

Related Articles

Back to top button