Maharashtra Shikshak Bharti 2023 शिक्षक भरतीचा नवा मुहूर्त ऑगस्टमध्ये!
Maharashtra Shikshak Bharti 2023 यवतमाळ अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त ऑगस्ट महिन्यात निघाला आहे.
Table of Contents
पोर्टल अॅक्टिव्ह करण्याचे नियोजन
सध्या कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मेपर्यंत पूर्ण करून त्यानंतर नव्या शिक्षक भरती साठी पवित्र पोर्टल अॅक्टिव्ह करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शालेय शिक्षण विभागाला कळविले आहे.
दोन लाख डीएड, बीएड धारकांचा निकालही जाहीर Maharashtra Shikshak Bharti
फेब्रुवारी-मार्च मध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. २४ मार्च रोजी या परीक्षेतील दोन लाख डीएड, बीएड धारकांचा निकालही जाहीर करण्यात आला.
मात्र, दोन महिने उलटूनही पवित्र पोर्टलच्या हालचाली नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शासनाला पदभरतीचे वेगवान नियोजन करणे भाग पडले.
Mega Police Bharti :2140 कारागृह पदाची भारती होणार
Nashik Municipal Corporation Recruitments :नोकरभरतीस हिरवा कंदील