Madh Kendra Yojana 2023 मध केंद्र योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू, जाणून घ्या काय आहे योजना
Madh Kendra Yojana भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन,पशूपालन बरोबर मधुमक्षिका पालन या एक महत्वाचा व्यवसाय आहे. या सर्व उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात, यातील च एक महत्वाची योजना म्हणजे मध केंद्र योजना.
Table of Contents
याच मधकेंद्र योजनेसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2022-2023 करीता पात्र व्यक्ती आणि संस्थाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Madh Kendra Yojana maharashtra अटी पात्रता
या योजने अंतर्गत मधकेंद्र सुरू करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 50 % अनुदान स्वरुपात देण्यात येते तर 50 % गुंतवणूक ही लाभार्थ्याला स्वहिस्या तून करावी लागते.
या योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यासोबत मधमाशा संरक्षक व संवर्धन याबाबत मोफत प्रशिक्षण व जनजागृती मंडळामार्फत करण्यात येते.
वैयक्तिक मधपाळ योजना
वैयक्तिक मधपाळ म्हणून प्रशिक्षण घेणेसाठी अर्जदार साक्षर असावा ही महत्वाची अट आहे
लाभार्थ्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
या योजनेअंतर्गत लाभासाठी लाभार्थ्यां कडे स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
याचबरोबर मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.
GR Link…. DOWNLOAD PDF
केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजना
Madh Kendra Yojana केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजनेसाठी मधपाळ संस्था, व्यक्तिंना प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार किमान 10 वी पास असावा.
लाभार्थ्यांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे
अर्जदार व्यक्तींच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन असावी.
लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्र चालक मधपाळ प्रशिक्षण संस्था
केंद्र चालक मधपाळ प्रशिक्षण संस्थेसाठी अर्ज केलेली संस्था ही नोंदणीकृत असावी.
अर्जदार संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षांसाठी भाडे तत्वावर घेतलेली 1 एकर शेतजमीन असावी.
याचबरोबर प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी अर्जदार संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर 1000 चौ.फुट सुयोग्य इमारत असावी.
संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावे.
Bulk Milk Cooler Yojana 2023 दूध शितकरण यंत्र अनुदान योजना 75% अनुदान