Namo Shetkari Sanman Registration 2023 :नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
Namo Shetkari Sanman Registration नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला कायमस्वरूपी 6 हजार रुपयांचा थेट लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना वितरित केल्यानंतर या योजनेत नवीन लाभार्थी वाढविण्यासाठी लगेच नवीन नोंदणी सुरू केली जाईल. कारण पहिला हप्ता राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
Table of Contents
पुढे या योजनेचा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना देण्याचा राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पहिला हप्ता वितरित झाल्यानंतर नवीन लाभार्थ्यांची नोंदणी लगेच सुरू केली जाणार आहे. या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या 6 अटी असणार आहे. त्याचबरोबर नोंदणी करण्यासाठी 8 प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. कोणकोणत्या सहा अटी असणार आहे आणि नोंदणी करण्यासाठी कोणकोणती 8 कागदपत्रे लागणार आहे जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नमो शेतकरी योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Namo Shetkari Sanman Registration PM किसान योजनेप्रमाणेच राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 6 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि PM किसान व नमो शेतकरी सन्मान या दोन्ही योजना एकत्रितपणे राबवली जाणार आहे. त्यामुळे पीएम किसान लाभार्थ्यांना या दोन्ही योजनांचे 12 हजार रुपये मिळणार आहे. तसेच जे शेतकरी पुढे नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये नोंदणी करून पात्र होतील त्यांना देखील या दोन्ही योजनांचे वर्षाला 12000 रुपये मिळणार आहे. 4000 रुपयांचे हप्त्याप्रमाणे वर्षभरात 3 टप्प्यात 12 हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत राहतील.
आवश्यक 8 कागदपत्रे
- Namo Shetkari Sanman Registration नमो शेतकरी सन्मान योजनेचा नवीन शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी केव्हा पण नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.
- त्यामुळे 8 कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी ही 8 कागदपत्रे लागणार आहे.
- 1) दोन फोटो
- 2) आधार कार्ड
- 3) रहिवासी दाखला
- 4) उत्पन्नाचा दाखला
- 5) जात प्रमाणपत्र
- 6) सातबारा उतारा किंवा ८ अचा दाखला
- 7) रेशन कार्ड
- 8) बँक पासबुक व मोबाईल नंबर
- हे आठ कागदपत्र फॉर्म भरतावेळी जवळ असणे आवश्यक आहे.
- यापैकी एक जरी कागदपत्रे नसेल तर नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये नोंदणी करू शकणार नाही.
अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज
Namo Shetkari Sanman Registration योजनेच्या अटी व पात्रता
- PM किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना राज्य सरकारने राबवली आहे.
- त्यामुळे ज्या PM किसान योजनेच्या सहा अटी आहेत त्यात सहा अटी या योजनेत लागू होणार आहे.
- 1) नोंदणी करणारा शेतकरी हा मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- 2) अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे थोडीफार तरी शेती असावी.
- 3) नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्याच्या बँक खात्याला आधार लिंक असावे.
- 4) लाभार्थ्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा.
- 5) नोंदणी करणारा लाभार्थी हा अल्पभूधारक शेतकरी असावा. म्हणजेच ज्या शेतकऱ्याकडे दोन किंवा अडीच एकर जमीन असेल त्याच शेतकऱ्याला लाभ घेता येणार आहे.
- 6) लाभार्थी हा कोणतीही शासकीय नोकरी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय तसेच कोणत्याही प्रकारचा पेन्शन धारक नसावा.
Namo Shetkari Sanman Registration या सहा अटींमध्ये जे शेतकरी पात्र असतील त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. नोंदणी होण्याआधी जेव्हा या संदर्भात ज्या निर्गमित केला जाईल त्यावेळी या अटींमध्ये बदल केला जाऊ शकतो.