TrendingWeather Update

Weather Update 2023-24 आता ‘ओला दुष्काळी’ म्हणून मराठवाड्याची ओळख होणार, हवामान अभ्यासक पंजाबराव डख

Weather Update या वर्षी दुष्काळाचे सावट असल्याचा अनेक संस्थांचा अहवाल सध्या शेतकऱ्यांची झोप उडवत आहे. मात्र, या वर्षी भरपूर पाऊस पडेल, असा ठाम विश्वास हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पेठवडज येथे व्यक्त केला.

कंधार तालुक्यातील पेठवडज येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शक मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, यावर्षी ८ जूनला मान्सून मुंबईत येणार आहे आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल. २७ ते ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील. ज्या शेतकऱ्यांच्या या कालावधीत पेरण्या होणार नाहीत त्या शेतकऱ्यांच्या जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तविला आहे.

krushisahayak

असा राहील या वर्षी पाऊस

या वर्षी जूनच्या तुलनेत जुलैमध्ये अधिक पाऊस राहील. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अधिक पाऊस राहील, असे डख यांनी नमूद केले. Weather Update २०२२ सारखाच यंदाचा मान्सून शेतकन्यांसाठी चांगला राहील, असेही ते म्हणाले. मागील वर्षीपेक्षा अधिक चांगला पाऊस आता राहील. भविष्यात काही भागात अधिक पावसाची शक्यता असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीच्या कडेला चर खोदावे लागणार आहेत.

krushisahayak

पंजाब राव डक यांचा हवामान अंदाज

अशी करा कापूस उत्पादनात वाढ

कापूस उत्पादनात वाढ करण्यासाठी एकरी रोपाची संख्या वाढविली पाहिजे. सोयाबीन बाबतीत नवीन जातीचा वापर करावा, असे आवाहन करीत हातामध्ये घातलेल्या धातूच्या कड्यामुळे वीज त्या माणसावर पडते, असेही मार्गदर्शन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना केले.

krushisahayak

Farmers Corner शेतकऱ्याचा नादच खुळा…! पिकावर वॉच ठेवण्यासाठी लावले सीसीटीव्ही

मानार व पेठवडज धरण तुडुंब भरणार Weather Update

मानार प्रकल्प व मध्यम पेठवडजप्रकल्प व डाव्या कालव्याच्यासिंचनावर अवलंबून असणारेकंधार तालुक्यातील प्रकल्प हेदोन्ही तुडुंब भरणार आहेत.

भविष्यामध्ये मराठवाड्यामध्येकोरडा दुष्काळ पडणार नाही तरतो ओला दुष्काळच होईल, असेते म्हणाले.

मागील चार वर्षांपासून पाऊसपश्चिमेकडून येत नसून पूर्वेकडूनयेत आहे. त्यामुळे हा बदल होतआहे.

Maharashtra Land Rate Valuation :जमिनीचे शासकीय भाव तुमच्या मोबाइल वर पाहा

Farming Tips Benefits :एक पीक देते 2 लांखाचे उत्पादन तर दुसरे देते रोजचे 2 हजार रुपये

Related Articles

Back to top button