TrendingBreaking News

MSRTC Bus कोरोनानंतर लालपरीने ओलांडला 57 लाख प्रवाशांचा टप्पा

MSRTC Bus कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने मोठा फटका बसलेल्या एसटीने२०२० नंतर पहिल्यांदाच ५७ लाख प्रवासीसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. गेली ७५वर्षे अखंड सेवा देणाऱ्या एसटीची चाकेकोरोनामुळे थांबली होती. संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बस बंद होत्या. नंतर हळूहळू एसटी पूर्व पदावर येत असताना संपामुळे पुन्हा सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यातून प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली होती.

सर्व कटू प्रसंगांना मागे सोडत त्यानंतर नव्या उमेदीने एसटीने पुन्हा सुरुवात केली. २०२२ च्या जानेवारी महिन्यात दररोज सरासरी फक्त ३ लाख प्रवाशांची ने-आण करणारी एसटी आता (मे २०२३) तब्बल सरासरी ५७ लाख प्रवाशांची ने-आण करीत आहे. यासाठी एसटीचे कर्मचारी, अधिकारी यांचे अथक प्रयत्न, प्रवाशांचा एसटी वरील दृढ विश्वास कारणीभूत आहे.

krushisahayak

जेष्ठ नागरिक विद्यार्थी व अपंगाना सवलत जाहीर

एसटी सुसाट; उत्पन्नातही झाली भरघोस वाढ

शालेय मुलांना उन्हाळ्याची सुटी आहे.लग्नसराई सुरु आहे. प्रवासी एसटीमहामंडळावर चांगला विश्वास दाखवत आहेत.महामंडळानेही जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर२९ कोटी उतरविल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नात भरघोसवाढ झाली आहे. ८ मे रोजी विक्रमी २९कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.

krushisahayak

यांना मिळणार मोफत प्रवासाचा लाभ

या निर्णयांनी प्रवासी संख्येत वाढ MSRTC Bus

महाराष्ट्र शासघेतलेल्या दोन क्रांतिकारीनिर्णयामुळे एसटीच्या प्रवासीसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ वर्षेपूर्ण केलेल्या ज्येष्ठांना एसटीच्यासर्व प्रकारच्या बसमधून मोफतप्रवास आणि महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत लागू करण्यात आली.

त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढत आहे. बस गाड्यांची कमतरता , वाहनांच्या सुट्या भागांचा अभाव ,डिझेलचे वाढते दर, जुन्या झालेल्या बस, नादुरुस्त बसचे वाढते प्रमाण अशा अनेक अडचणींवर मात करत एसटी आता वाटचाल करत आहे.

Home Lone : शेतकर्‍यांना घर बांधण्यासाठी बँक देणार 50 लाखांपर्यंत कर्ज

Maharashtra Land Rate Valuation :जमिनीचे शासकीय भाव तुमच्या मोबाइल वर पाहा

Salokha Yojana 2023 :आता रजिस्ट्री होणार फक्त दोन हजार रूपयात

Related Articles

Back to top button