Namo Shetkari Mahasanman Nidhi शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार महिना अखेरीस होणार जमा
Namo Shetkari Mahasanman Nidhi केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी. वर्षभरात लागणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकार कडूनही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ची घोषणा करण्यात आली.
Table of Contents
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत असून यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जाणार आहे.
निधीची तरतूद.
कोरोनानंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना निधी उभारण्याचे आव्हान आहे. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यात येईल. त्याआधी आपत्कालीन निधीसाठीच्या रकमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
या तारखेला पैसे खात्यात जमा होणार
लाभार्थ्यांच्या संख्येला कात्री Namo Shetkari Mahasanman Nidhi
केंद्राच्या योजनेत सुरुवातीला महाराष्ट्रातून १ कोटी १५ लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरले. मात्र करपात्र तसेच लोकप्रतिनिधी असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाल्याचे लक्षात येताच या यादीला कात्री लावण्यात आली.
लाभार्थ्यांच्या संख्येबाबत सरकारने कडक भूमिका घेत शेतकऱ्यांकडून भूमिअभिलेख खात्यात जमिनीची अद्ययावत नोंद करणे, ई-केवायसी करणे, बँक खात्याला आधार जोडणे आदी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. या छाटणीत अनेक शेतकरी अपात्र ठरले आणि ही संख्या ८१ लाखांपर्यंत खाली आली. त्यामुळे आता ही अंतिम यादी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Tractor Trolley Anudan : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर
Cotton Update 2023 विकेल शेतकरी कापुस आणि कसा होईल भारत कृषीप्रधान देश.